🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे.
याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया आज पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.
रिषभच्या या खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक होत आहे. अशातच भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने रिषभ सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी झालेल्या संभाषणाचा उलगडा केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान रैना म्हणाला की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याची व रिषभची भेट झाली होती. त्यावेळी रिषभ रैनाला म्हणाला, ‘मला जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज बनायचे आहे.’
रिषभ सोबत सरावादरम्यानचा प्रसंग उलगडताना रैना म्हणाला,’त्याच्याबद्दल मीडियात बऱ्याच बाबी बोलल्या जातात. त्यामुळे रिषभला या सर्वांपासून ब्रेक हवा होता. त्याला केवळ ऐकायचे होते. त्याला माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नव्हती.’
रैना पुढे म्हणाला,’रिषभ हा एक प्रतिभावान युवा खेळाडू असून, माझ्या मते तो आगामी काळात भारतासाठी एक मोठा खेळाडू बनणार आहे. मागील वर्षी जूनमध्ये तो खराब फॉर्ममध्ये असताना येथे आला होता. जेव्हा आमचा सराव नसायचा, तेव्हा तो संपूर्ण दिवस घरीच असायचा. माझ्या मुलांसोबत खेळायचा, माझ्या पत्नी सोबत गप्पा मारायचा. आम्ही नेटफ्लिक्सवर बरेच विनोदी चित्रपट बघितले.’
रिषभच्या फिटनेसबद्दल बोलताना रैना म्हणाला, ‘रिषभने माझ्यासोबत फिटनेस वर बरेच काम केले. त्याच्या फलंदाजीत काहीही कमी नव्हती, त्याला केवळ एका चांगल्या मनस्थितीत येणे गरजेचे होते.’
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रा खूश; या खेळाडूंना मिळणार SUV
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
