🕒 1 min read
मुंबई : ठाण्यातील ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक मागच्या काही दिवसांपासून आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडचणीत आले आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सक्तवसुली संचलनालय आणि सीबीआयच्या रडारवर ते असल्याचे पाहायला देखील मिळाले आहे. परंतु आज एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. ‘तुमच्या मागे काही करंटे लोक लागलेले असताना देखील जराही न डगमळता आपल्या सेवेचा वसा तुम्ही सुरू ठेवला. हीच शिवसेना आणि शिवसैनिकांची जिद्द आहे.
त्याला जागून तुम्ही जनतेच्या हितासाठी खंबीपणे काम करत चालला आहात, असं सांगतानाच क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाज किंवा गोलंदाज चांगली बॅटिंग करतो, तेव्हा असं काही आजुबाजूला करायचं की त्याचं लक्ष विचलीत होतं. त्याच्या बॉलिंगची लेन्थ आणि लाईन चुकते आणि बॅट्समन सुद्धा डचमळतो. त्यामुळे तो आऊट होतो. तसाच हा घाणेरडा प्रकार आता या क्षेत्रात येत चालला आहे. आला आहे. तुम्ही त्यांच्या कामाने चोख उत्तर दिलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सरनाईक यांचं कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या बायोपिकमध्ये नीरज चोप्रा मुख्य भूमिकेत असावा’; अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील दुसरी शिलेदार ‘पी व्ही सिंधु’
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
