मुंबई: अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत भाजपने सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
“जाऊ दे हो राऊत साहेब, काश्मीर मध्ये भाजपाने जे केलं तो तुमच्या आकलना पलीकडचा विषय आहे, तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. दरम्यान शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ तसेच गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. यावरून भाजपने सेनेला निशाण्यावर धरले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीर समर्थनार्थ राहिले आहे. असे असूनही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणत आहेत. मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले असून शिवसेनेने नेहमी या विचारधारेचा विरोध केला आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
…त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सर्वांनी पाहावा- अमित शहा
‘पाणी वाचवा’ मोहिमेत मोदींना मुलांकडून अपेक्षा; ‘Water Warrior’ म्हणत केले ‘हे’ आवाहन
बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती भाजपच्या ‘मैत्रीण’- संजय राऊत
“दोन्ही हातात घड्याळी असतात, याचं गुपित ५० लाख तर…”, भाजपचे टीकास्त्र
धन्य तो श्रावणबाळ! ‘त्या’ कारवाईवरून केशव उपाध्येंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

