🕒 1 min read
मुंबई: अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत भाजपने सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीर समर्थनार्थ राहिले आहे. असे असूनही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणत आहेत. मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले असून शिवसेनेने नेहमी या विचारधारेचा विरोध केला आहे. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तीने घेतलीये.मोदी हे २४ पैकी २२ तास काम करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. आता म्हणे मोदी यांना ती २ तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकूण मोदींचीही झोप उडाली असेल. बाकी कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलन्स्की, पुतिन. सारे बिनकामाचे आहेत. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
धन्य तो श्रावणबाळ! ‘त्या’ कारवाईवरून केशव उपाध्येंचा टोला
“यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे”, भातखळकरांचे टीकास्त्र
यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ला दिली दोन कोटींची भेट? आयटीच्या छाप्यात सापडली डायरी
IPL-2022 च्या पहिल्याच सामन्यात KKR चा CSK ला धक्का; कर्णधार जडेजाने सांगितले पराभवाचे कारण
IPL 2022: आज मुंबईशी भिडणार दिल्ली कॅपिटल्स; विराटचा ‘तो’ विक्रम रोहित मोडणार का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
