Share

…त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सर्वांनी पाहावा- अमित शहा

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी हा चित्रपट का बघावा, यासंदर्भात वक्तव्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अमित शहा म्हणाले की,‘ काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे कळण्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सर्वांनी जरूर पाहावा. नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यात आले तेव्हा त्यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. त्यानंतर देशभरातील लोकांना हे समजले की नरेंद्र मोदींसारख्या प्रबळ इच्छाशक्तीच्या नेत्याने देशाचे नेतृत्व केले तर काहीही अशक्य नाही.’

दरम्यान, देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!