Share

‘सेव्हींग ठेवलीच पाहिजे, आपल्या करिअरचा काही भरोसा नाही’ ; सचिनचा कलाकारांना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात सगळ्यांचीच कामं बंद पाडल्यामुळे अनेक बॉलीवूड अभिनेत्री तसेच अभिनेते अनेकांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे आर्थिक मदत मागावी लागली. अशातच बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आहे. त्यांच्या अभिनयाचा आणि सुंदरतेचा मोठा चाहता वर्ग होता. मात्र सविता बजाज यांच्यावर सध्या आर्थिक संकट ओढवले. सध्या त्या आजारपणामुळे चिंतेत आहेत. उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सविता यांना मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘माझी स्थिती फार खराब आहे. माझ्याकडे कोणीही नाही. मी खूप पैसे कमावले होते पण सगळे उपचारांसाठी खर्च झाले. बँकेत केवळ ३५ हजार रुपये होते ते देखील काढले आहेत. गळा दाबून मला मारून टाका , मला असं जीवन नाही जगायचं. यापेक्षा तर मेलेलं बरं. या जगात माझं कोणी नाही, जो माझी काळजी घेईल,’ अस म्हणत त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले होत.

याच पार्श्वभूमीवर आता अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भाष्य केलं आहे. प्रसिद्ध वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकर म्हणाला, मी वर्तमानपत्रांमध्ये सविता यांच्याविषयी वाचले. असोसिएशनच्या लोकांनी पुढे येऊन त्यांना मदत करावी. आर्टिस्ट आणि काही टेक्निशियन्स यांची देखील त्यांनी मदत करावी. जर तुम्ही CINTAA आणि IMPPAकडे मदत मागितली तर ते तुमची मदत नक्की करतील. त्यामुळे तुम्ही सदस्य असणे महत्वाचे आहे. असं सचिनने म्हंटल आहे.

पुढे सचिन म्हणाला, तुम्हाला तुमची सेव्हींग ठेवलीच पाहिजे. कधीही काहीही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की, आपल्या करिअरचा काहीच भरोसा नाही. असंही यावेळी सचिननं म्हंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!