Share

‘तू म्हातारा झाला’; शर्टलेस फोटोवरून तुषार कपूर ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर विनोदी भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. गोलमाल या हिंदी चित्रपटामुळे तो अनेकांच्या पसंतीस पडला. यातील त्याचा अभिनय पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. मात्र सध्या त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्याला जोरदार ट्रोल करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CUT6vW8NXUy/?utm_source=ig_web_copy_link

तुषार कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाथरुमधील सेल्फी काढून शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. परंतु हा फोटो पाहून नेटकऱ्यांना  तुषार कपूरला वयावरुन ट्रोल केले आहे. एका यूजरने ‘गुरु, तू म्हातारा झाला’, असे म्हटले आहे.

अभिनेता तुषार सध्या चित्रपटापासून लांब असल्याचे दिसत आहे. चित्रपटसृष्टीत त्याला म्हणाव तसे यश मिळाले नाही. मात्र ‘गोलमाल’ या चित्रपटामुळे तो प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटातील तुषारची विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या भुमिकेमुळे तो चर्चेत आला होता. त्यानंतर आता या फोटोमुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!