Share

मिस्टर मोदी… तुम्ही ‘हे’ सांगायला विसरलात!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे एकाच चितेवर आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. हे अत्यंत विदारक चित्र असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. हाच धागा पकडून खासदार जलील यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक व्हिडीओ भाषण व्हायरल होत आहे. हे भाषण तसे जुने आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी फत्तेपूर इथल्या सभेमध्ये कब्रस्थान आणि स्मशान भूमी संदर्भात बोलत आहे. गावात जर कब्रस्थान तयार होणार असेल तर गावामध्ये स्मशानदेखील तयार व्हायला हवे, असे मोदी या भाषणामध्ये सांगत आहे. याच  भाषणावर खासदार जलील यांनी टीका केली आहे.

हे भाषण शेअर करत खासदार जलील म्हणाले की, ‘…आणि कब्रस्थान आणि स्मशानामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख करायला मोदी विसरले आहेत.’ राज्याची आणि एकूणच देशाची स्थिती पाहता, मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार त्या संबंधी उपाय करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना हवे तसे यश मिळतांना दिसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या       

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!