Share

पेट्रोलच काय चार्जिंगची देखील गरज नाही इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी; केवळ २४ तासात सर्व कार सोल्ड

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात मंदावलेले वाहन उद्योग आणि वाहन खरेदी यानां अनलॉक नंतर गती मिळाली आहे. कोरोना काळात डबघाईला आलेल्या ऑटो इंडस्ट्रीने आता चांगला वेग पकडला आहे. पेट्रोल-डिझेलशिवाय आता कार कंपन्या आपला फोकस इलेक्ट्रिक कारकडे वळवत आहेत. पण इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याची मोठी चिंता आहे. मात्र या चिंतेवरही अमेरिकेने तोडगा काढला आहे.

अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनीने तीन चाकांची कार लाँच केली आहे. ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही चार्जिंगची गरज लागणार नाही.  Aptera Motors नावाच्या या स्टार्टअपने पहिली सोलर इलेक्ट्रिक (sEV) गाडी लाँच केली आहे. जी दररोज चार्ज करण्याची आवश्यकता नाही. ही कार सोलर पॉवरवर चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर कार 1600 किलोमीटरपर्यंत चालण्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे अंतर कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत अधिक असून टेस्ला कारही यात मागे आहे.

या स्टार्टअपचे सह-संस्थापक क्रिस एंथनी यांनी सांगितलं की, ‘या टेक्नोलॉजीसाठी सूर्याच्या उर्जेची पावर मिळेल. कारमधील बिल्ट इन सिस्टम आपलं चार्जिंग नेहमी मेंटेन ठेवतं. हा चार्जिंग स्पीड जवळपास 500 मैल ताशी स्पीडने चार्ज होईल.’ Aptera ने नुकतंच आपल्या Solar Powered Electric Vehicle चा प्री-ऑर्डर सेल सुरू केला होता. केवळ 24 तासाहून कमी वेळेत सर्व कार सोल्ड आउट झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!