मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. त्यांचे गाणे असो वा एखाद्या विषयावर ट्विटरद्वारे त्यांनी प्रकट केलेले विचार, नेटकऱ्यांसह अनेक चर्चांमध्येही त्यांच्यावर टीका केली जाते.
काही दिवसांपूर्वीच ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. या गाण्यावर अक्षरशः डिसलाईक्सचा वर्षाव करण्यात आला होता. या गाण्याचा आशय चांगला असला तरी राजकीय विरोधाने ट्रोल केलं जातं असं देखील त्या म्हणाल्या. आता, 17 डिसेंबर त्यांचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे.
अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी माझे अजून एक गाणे येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांचे स्वागत असल्याचे म्हणत आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली.
अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणे येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अमृता यांचे नवे गाणे येत्या गुरुवारी येणार असून हे गाणे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी रिलीज केले जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाइन याचिकेचे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी समर्थन केले आहे.
हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये, अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. अमृता यांचा या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये उल्लेख मामी असाही करण्यात आला आहे.
पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे असल्याचे या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे, आपला कान, आपली जबाबदारी, असेही लिहिण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
- शेतकरी आंदोलन लवकर मागे घेतले नाही तर…,’सीआयआय’ने दिला धोक्याचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

