🕒 1 min read
नवी दिल्लीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती त्यामध्ये चार चाकी वाहनांचे उद्योगाला मोठा ब्रेक लागला होता. त्यामुळे यामध्ये कोरोनामुळे जीवितहानीसोबतच आता आर्थिक नुकसानही व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे भारतातल्या कार उत्पादक कंपन्यांनी कारचं उत्पादन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र आता या प्रक्रियेनंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर ह्युंदाई क्रेटा ची ७ सीटर व्हेरियंट भारतात पहिल्यांदा दिसल्या नंतर आता
ह्युंदाई क्रेटाच्या लीक झालेल्या फोटोतून ७ सीटर व्हर्जन संबंधी खूप मोठी माहिती समोर आली आहे. याआधीही यासंबंधीची माहिती देण्यात आली होती की, कंपनी नवीन ७ सीटर क्रेटा एका नवीन नावाने लाँच करू शकते.
नवीन क्रेटामध्ये कंपनी युनिक टेल लाइटचा वापर करणार आहे. फ्रंट लूकमध्ये कंपनी नवीन ग्रिल डिझाइन सोबत या कारला बाजारात उतरवणार आहे. नवीन क्रेटा सध्याच्या मॉडलपेक्षा लांब असणार आहे. रियर व्हील जवळ एक्स्ट्रा स्पेस मध्ये कंपनी थर्ड रो सीट जोडणार आहे. कारच्या फ्रंटमध्ये ग्रीलची डिझाइन मध्ये बदल केला जाणार आहे. नवीन डिझाइन कारला अॅग्रेसिव लूक देतो. कारमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा दिले आहेत.
स्पाय शॉट्स मध्ये क्रेटा इंटिरियरची जास्त माहिती समोर आली नाही. या कारच्या इंटिरियरमध्ये १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली गेली आहे. तसेच कारमध्ये ऑटो डे – नाइट रियरव्ह्यू मिरर दिले आहे.
या आधी आलेल्या ह्युंदाईच्या 5 सीटर क्रेटा मध्ये देखील खास डिझाइन होत्या. ही कार पाच मॉडल्समध्ये E, EX, S, SX आणि SX (O) मध्ये येते. याचे इंजिन आणि गियरबॉक्स किआ सेल्टॉस मधून घेण्यात आले आहे. ही तीन ऑप्शनमध्ये येते. १.२ लीटर पेट्रोल, १.५ लीटर डिझेल आणि १.४ लीटर टर्बो पेट्रोल मध्ये येते. हे इंजिन अनुक्रमे पॉवर व 144Nm टॉर्क, 115PS ची पॉवर व 250Nm टॉर्क, आणि 140PS ची पॉवर आणि 242Nm चे टॉर्क जनरेट करते.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
- शेतकरी आंदोलन लवकर मागे घेतले नाही तर…,’सीआयआय’ने दिला धोक्याचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

