Share

अहमदभाई दंतकथा म्हणून कायम चर्चेत राहतील – बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते राज्यसभा खासदार स्व. अहमद पटेल यांची शोकसभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी आठवणांनी उजाळा दिला. अहमद पटेल म्हणजे सतत कामात व्यस्त असणारा माणूस, अशी माणसं शोधून सापडत नाहीत. त्यांनी २६ व्या वर्षी पहिली निवडणुक लढवली, शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले पण कधीच मंत्री करा अशी मागणी केली नाही. त्यांनी स्वतःला पक्षासाठी वाहून घेतले होते, माझा पक्ष अधिकाधिक मजबूत कसा होईल, तो पक्ष कसा रुजले यातच त्यांना जास्त रस होता, अशी माणसे विरळाच असतात. महाराष्ट्रातील राजकारणात अहमद पटेल यांच्यामुळेच तीन पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडी आकारास येण्यास अहमदभाईंचे योगदान मोठे आहे, त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त केल्या.

तर, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार साकारण्यात स्व. अहमद पटेल यांची भूमिका महत्वाची होती. शेवटच्या क्षणात त्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हे सरकार स्थापन झाले. अहमदभाई यांची प्रचंड स्मरणक्षमता होती. देशांतील सर्व राज्यातील राजकीय नेत्यांची जाण, माहिती अहमदभाईंना होती. पडत्या काळात काँग्रेस पक्षाची उंची वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. विद्यमान पंतप्रधान नरेंद मोदी यांना आव्हान देण्याची ताकद त्यांच्यात होती. महाविकास आघाडीला ते कायम मार्गदर्शन करत आले. अहमद पटेल जाणे म्हणजे एक अध्याय संपला. दंतकथा म्हणून भाई कायम चर्चेत राहतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, १९८४ साली राजीव गांधी यांच्याबरोबर काही तरुण चेहरे दिसत होते त्यात अहमद पटेल हे दिसत. उभं आयुष्य त्यांनी संघटनेसाठी काम केले.सतत संघटनेचाच विचार त्यांच्या मनात असायचा. युपीएचे सरकार केंद्रता असताना दहा वर्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. युपीए सरकारच्यावेळी काही समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी यांच्यावतीने, मनमोहनसिंग यांच्यावतीने ते जबादारी पार पाडत असत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. दहा वर्ष मनमोहसिंग यांचे सरकार हे सरकार कसे टिकेल, सर्व पक्षात सामंजस्य कसे टिकेल, मार्ग कसा काढता येईल याची जबाबदारी अहमदभाईंवर असायची. सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांचा स्वभाव, कल हा संघटनेसाठी काम करण्याकडे होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!