Share

आपण कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा प्राण्यांच्या आवाजानेच प्रचंड गाजल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनात कधी मांजर, कधी श्वानाचा वारंवार उल्लेख करत एकमेकांना प्राण्यांच्या उपमा देत सत्ताधारी विरोधकांमध्ये टीकाटीपण्णी, शाब्दिक युद्ध चांगलेच रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.

विधीमंळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly) यंदा जनतेच्या प्रश्नांच्या तुलनेत कुत्र्या-मांजरांचा वारंवार उल्लेख करणे, हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांना चांगलंच खडसावले आहे.

ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार (Maharashtra MLA) इथपर्यंत पोहोचतात, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलात तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपण काय बोलतोय, याचे भान ठेवा, असे सांगत अजित पवार यांनी सभागृहामध्ये बोलताना आमदार मंत्र्यांनचेही कान टोचले आहेत.

‘प्राण्यांचा आवाज काढणं हा मतदारांच्या विश्वासाला तडा जाणे आहे. त्यांचा अपमान करणे आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीने आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख पक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!