🕒 1 min read
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेतील काही आरोपींनी दोन दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
“पुन्हा एकदा पुणे हादरलंय.. १५ वर्षीय मुलीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना हवेली तालुक्यातील डोणजे इथे घडली. धक्कादायक म्हणजे यातील २ आरोपींनी दोनच दिवसांपूर्वी आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. यात अजूनही लक्ष्मण पाटील फरार आहे. आरोपीला तात्काळ अटक करा”, अशी मागणी चित्रा वाघ यांनी ट्विट करत केली आहे.
पुन्हा एकदा पुणे हादरलंय..
१५ वर्षीय मुलीवर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना हवेली तालुक्यांतील डोणजे इथे घडलीय..
धक्कादायक म्हणजे यांतील २ आरोपींनी दोनच दिवसांपूर्वी आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता..यात अजूनही लक्ष्मण पाटील फरार आहे..आरोपीला तात्काळ अटक करा pic.twitter.com/w78MHxBs1v— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 28, 2021
या घटनेतील आरोपी निलेश नेटके (२१), लक्ष्मण पाटील (२२) व इतर तीन आरोपी अल्पवयीन आहेत. (सर्व रा. डोणजे ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील निलेश नेटकेला पोलिसांनी अटक केली असून लक्ष्मण पाटील फरार आहे. आरोपींवर हवेली पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडीओ तयार केले. घडलेल्या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला व तिच्या आईला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडीत मुलीने याबाबत माहिती दिली. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम याबाबत अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- “‘ही’ परिस्थिती सरकारच्या नाकर्तेपणाची व महाराष्ट्राच्या दुर्देवाची साक्ष देते”
- देशाचा स्वातंत्र्यलढा, लोकशाहीची स्थापना व राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान-अशोक चव्हाण
- आयपीएलच्या पुढील हंगामात ‘हे’ खेळाडू असणार 10 संघांचे कर्णधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
