🕒 1 min read
अहमदनगर: कवितेसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री आठवले (Union Minister Ramdas Athavale) नेहमीच आपल्या कवितेत सद्य परिस्थितीवर भाष्य करत असतात. काल (२७ फेब्रुवारी) त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावर कविता केली. तसेच आगामी लोकसभेबाबतही त्यांनी कवितेतून नारा दिला आहे.
आगामी लोकसभेबाबत बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्हाला ४०४ जागा मिळणार आहेत. त्यांच्या पाठीमागे सर्व देश उभा आहे.” तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, मायावतींचा जनाधार उत्तर प्रदेशात घसरला आहे. आरपीआयकडे लोकांचे लक्ष आहे. आरपीआयमुळे पंचवीस टक्के दलीत मतं भाजपाला मिळतील. “समाजवादी पार्टीवर करा तुम्ही वार, भाजपा करणार आहे तिनशे जागा पार”, असा नारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावरही कविता केली आहे. ते आपल्या कवितेतून म्हणतात की, “पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…म्हणून परेशान आहे युक्रेन”, अशा शब्दांत त्यांनी कविता करून रशिया – युक्रेन युद्ध थांबून चर्चेतून मार्ग काढावा आणि शांती प्रस्थापित झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IND vs SL : भारतीय संघाच्या विजयासाठी श्रेयाने मोठा गेम केला यार!
-
“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…”, केंद्रीय मंत्री आठवलेंची रशिया-युक्रेन युद्धावर कविता
-
IND vs SL : श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय ; रचले नवीन रेकॉर्ड
- “…ते असते तर म्हणाले असते, ‘आनंद वन भुवनी’; राज्यपाल कोश्यारींचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
