🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजीने सगळ्यांची मन जिंकली आहेत. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले आणि भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आले आणि त्याने आपल्या फलंदाजीने भारताला ही मालिका जिंकण्यास मदत करण्यात अप्रतिम भूमिका बजावली. त्याने सलग तीन सामन्यांमध्ये तीन नाबाद अर्धशतके झळकावली आणि संपूर्ण मालिकेत त्याच्या शानदार फलंदाजीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय भूमीवर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सलग तीन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरपूर्वी कोणत्याही फलंदाजाने ५० पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत, परंतु अय्यरने (shreyas iyer) ते आश्चर्यकारकपणे केले आणि इतिहास नवीन आपल्या नावे केला आहे. तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सलग ५०+ धावा करणारा भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या कोणत्याही टी-२० मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (rohit sharma) नावावर होता, मात्र आता श्रेयस अय्यरने त्याचा विक्रम मोडला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कोणत्याही T20I मालिकेत भारतासाठी २०० हून अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये श्रेयसने एकूण २०४ धावा केल्या आणि विशेष म्हणजे तो प्रत्येक डावात नाबाद राहिला.
श्रेयस अय्यरने लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद ५७ धावा केल्यामुळे भारताने हा सामना ६२ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात त्याने धर्मशाला येथे नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला. त्याचवेळी, तिसऱ्या सामन्यात त्याने ४५ चेंडूंचा सामना करत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची धमाकेदार खेळी केली. श्रेयस अय्यरच्या या खेळीच्या जोरावर भारताने तिसरा सामना ६ गडी राखून जिंकला आणि टीम इंडियाने तीन सामन्यांच्या T20 मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. श्रेयसने अप्रतिम कामगिरी करत भारताच्या विजयाचा मानकरी ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?”, राज्यपालांचे खळबळजनक वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल
- IND vs SL : श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय ; रचले नवीन रेकॉर्ड
- “…ते असते तर म्हणाले असते, ‘आनंद वन भुवनी’; राज्यपाल कोश्यारींचे मोठे वक्तव्य
- भारतीय जनता पक्षातील नेत्याचा शिवसेनेला इशारा
- Russia-ukraine War:आक्रमक रशिया विरोधात एलोन मस्कची युक्रेनला महत्वाची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
