🕒 1 min read
नवी-दिल्ली : ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्व नेत्यांची भेट घेतली. परंतु इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि पंतप्रधान मोदी यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी नफ्ताली बेनेट आणि मोदी यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तसेच उच्च-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर विचाराबाबत चर्चा केली.
Israel's PM Bennett to @narendramodi: You are the most popular man in Israel. Come and join my party pic.twitter.com/0VH4jWF9dK
— Amichai Stein (@AmichaiStein1) November 2, 2021
दरम्यान, पंतप्रधान मोदींशी चर्चा करतांना नफ्ताली बेनेट म्हणाले की, तुम्ही इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहात, तुम्ही माझ्या पक्षात सामील व्हा. यानंतर पंतप्रधान मोदी हसायला लागले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांच्या औपचारिक भेटीनंतर संक्षिप्त चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लोक इस्रायलशी असलेल्या मैत्रीला खूप महत्त्व देतात. दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
