नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाल्याने या अधिवेशनाची सुरवात वादळी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे. दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अनिल देसाईंचा (Anil Desai) निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पाहायला मिळाला होता. 12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाली होती. त्यानंतर खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळानंतर शेवटच्या दिवशी एकूण १२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ती कारवाई शेवटच्या दिवशी झाली होती, म्हणून या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सर्व विरोधी पक्ष राज्यसभा सदस्यांना पूर्ण अधिवेशनासाठीच निलंबित करण्यात आलं. या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना सदस्यांनी माफी मागितल्यास कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. यावरून आता कारवाई झालेले खासदार माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- ‘हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं’
- ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल: एलॉन मस्कने केले कौतुक,म्हणाले..
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

