Share

शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील

Published On: 

सांगली : सांगलीत बोलत असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला, असा घणाघात केला आहे. तसेच, भाजप हाच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याची दावाही यावेळी त्यांनी केला आहे.

सांगलीच्या पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार प्रसंगी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे. शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने २१ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप राज्यात १ नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला १७ जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ १२ जागाच मिळाल्या. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आपला पक्षच संपवला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. असो. हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल. अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!