Share

सरकारी योजनांच्या अमलबजावणीसाठी तुम्हीही करा सहकार्य, सलील देशमुखांचे कोणाला आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राज्य सरकारच्या विविध विकास योजना गावापर्यंत पोहोचवा. यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करावे, असे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी केले. काटोल तालुक्यातील कोंढाळी व मेंटपांजरा सर्कलमधील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचांचा मेळावा घेऊन राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या मेळाव्याला ते संबोधित करीत होते.

राज्य सरकारच्या अनेक विकास योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मार्फत राबविल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना या योजनांची माहिती राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यात विविध विकास योजनांची माहिती दिली तसेच या योजना राबविण्यात येत असलेल्या अडचणींची माहिती देण्यात आली.

यावेळी जि. प. सदस्या पुष्पा चाफले, काटोलचे सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा खराडे यांच्यासह कोंढाळी व मेंटपांजरा सर्कलमधील पंचायत समिती सदस्य, सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अजय चरडे, खंडविकास अधिकारी विजय धापाके, नायब तहसीलदार नीलेश कदम आदींनी सरपंच व उपसरपंचांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली तसेच तक्रारींचे निराकरण करण्यात आले. घरकुल योजना, मृदजल संधारण, १५ वा वित्त आयोग अंतर्गत कोणकोणत्या विकास योजना येतात, याची माहिती देण्यात आली.

यावेळी देशमुख यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, असे आवाहन यावेळी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विकास योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद केलेली असते. या निधीचा वापर आपल्या गावाचा व परिसराचा विकास करण्यासाठी करण्यात यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी  सुद्धा पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन राज्य सरकारच्या योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करावे, असे आवाहन सलील देशमुख यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!