Share

स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो- शंकरराव गडाख

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या जाण्याने नगर शहराची हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्‍य आहे. शिवसेना आणि स्व.अनिल राठोड हे समीकरणच होते. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटुंब चालविण्याचे काम केले.

स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो. असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे. अहमदनगर शहरातील नक्षत्र लॉन येथे शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांना सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ना.गडाख बोलत होते.

ना.गडाख पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसांसाठी मोठ्या अधिकाऱ्यांना अंगावर घेण्याची धमक अनिल राठोड यांच्यात होती. त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काम केले म्हणून ते २५ वर्षे आमदार होते. अनिलभैय्यांच्या जाण्याने अहमदनगर शहराची तसेच शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. मला राज्याचे मंत्रीपद मिळण्यात स्व.राठोड यांचे सहकार्य होते, असे गडाख म्हणाले.

या श्रद्धांजली सभेत राज्यातील अनेक नेत्यांनी दृकश्राव्य माध्यमातून आदरांजली संदेश पाठविला. यात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे, बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव, माजी मंत्री गिरीश बापट, एकनाथ खडसे आदींचा समावेश होता.

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अभय आगरकर, वसंत लोढा, भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, कॉंग्रेसचे शहरप्रमुख किरण काळे, दीप चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!