नवी दिल्ली : देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. मागील रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने ही विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते.
दरम्यान, अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबर रोजी देशभरात या विधेयकाचा विरोध करत आंदोलन केले होते. त्यामुळे देशात या विधेयकावरून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असतानाच काल संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या तिन्ही विधेयकास मंजुरी देत आपली स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर आता निश्चित झाले आहे. राष्ट्रपतींनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर दिल्लीमध्ये शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. आज दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. यावेळी ट्रॅक्टर जाळण्यात आला. या विधेयकांवरु पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलनं करत आहेत. सोबतच देशभरात काँग्रेसकडूनही या विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉर्पोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.
महत्वाच्या बातम्या :-
- शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन
- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस!
- राज्यात लवकरच सत्तांतर होईल; भाजपच्या या माजी मंत्र्याचे भाकित!
- स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो- शंकरराव गडाख
- भाजपने सत्तेचे गड जिंकले मात्र एनडीए मधील ‘दोन सिंह’ मात्र गमावले; शिवसेनेचा भाजपवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

