Share

राज्यात लवकरच सत्तांतर होईल; भाजपच्या या माजी मंत्र्याचे भाकित!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घडल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

येत्या काही दिवसांत राज्यामध्ये सत्तांतर होणार असून भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते लवकरच आमच्या सोबत येणार आहेत असे खळबळजनक विधान माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते.

स्थायी समिती सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली.

त्यानंतर भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. याबाबत माजी मंत्री कर्डिले यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

थोड्याच दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर ते त्यांच्या स्वार्थासाठी किंवा पदासाठी राष्ट्रवादीत गेले असावेत. त्याबाबतचा सविस्तर खुलासा शहाराध्यक्ष व महापौर यांनी केला आहे. संबंधित नगरसेवकावर काय कारवाई करायची, याबाबत शहराध्यक्ष निर्णय घेतील, असेही कर्डिले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!