Share

फडणवीस, चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’, ‘सिल्वर ओक’समोर ढोल वाजवणार का?

Published On: 

कोल्हापूर : भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर एसटी आरक्षणाचा जीआर राज्य शासनाने काढावा या मागणीसाठी पंढरपूरमध्ये ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. या मागणीला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे का?, याचे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी द्यावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. तसेच पडळकरांनी पुढील ‘ढोल बजाओ’ आंदोलन ‘मातोश्री’ आणि ‘सिल्वर ओक’बाहेर करण्याचे जाहीर केले आहे. त्या आंदोलनात फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे ढोल वाजविताना दिसतील का? असा सवालही ढोणे यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर हे आरक्षणप्रश्नी सातत्याने धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत. पडळकर हे भाजपच्या व्होटबँक पॉलिटिक्ससाठी चुकीच्या मागण्या करून आंदोलनाचे शस्त्र बोथट करत असल्याची टीका धनगर विवेक जागृती अभियानाने केलेली आहे. 25 सप्टेंबरला पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या आंदोलनात राज्य शासनाने जीआर काढून आरक्षण द्यावे, या आरक्षणाचा केंद्राशी संबंध नाही, अशी भुमिका घेतली आहे. त्यावरही अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

यासंबंधाने पत्रकारांशी बोलताना ढोणे म्हणाले की, पडळकरांनी धनगर आरक्षणाचा वापर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी केलेला आहे. या विषयाचा त्यांचा कोणताही अभ्यास नाही. आक्रमकपणे खोटे बोलून त्यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी समाजाची मोठी फसवणूक केली आहे. एसटीचा दाखला घेतल्याशिवाय माघार नाही अशी भाषणे करणारे पडळकर हे भाजपशी सेटिंग करत होते. त्यांनी समाजाशी गद्दारी करून भाजप प्रवेश केला व विधान परिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर आता भाजपच्या सोयीसाठी धनगर समाजाला भडकावण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी अत्यंत चुकीच्या मागण्या केल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!