मुंबई – योगीजी पहिल्यांदा उत्तरप्रदेश भयमुक्त करा आणि मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला लगावला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इंडस्ट्री नेण्याबाबत मुंबईमधील अभिनेत्यांशी चर्चा करायला आले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
योगीजी तुम्ही एक गोष्ट विसरलात उद्योग व व्यापाराकरिता भयमुक्त वातावरणाची आवश्यकता लागते जे तुमच्या उत्तरप्रदेशातील नागरिकांना तुम्ही देऊ शकला नाहीत. दिवसा ढवळ्या बलात्कार, लूटमार, अपहरण हे तुमच्या राज्यातली रोजची घटना झाली आहे. मग उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांचे संरक्षण तुम्ही कसे करणार असा प्रश्नही महेश तपासे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

