Share

ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे

Published On: 

औरंगाबाद  : राज्यातील मविआ सरकारला  एक वर्ष पूर्ण झाले. हे सरकार  सर्वच स्तरावर पुर्णपणे अपयशी ठरले असून आपले अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवले जाते.सरकार चालवू शकत नाही, शेतकऱ्यांचे दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, विकास करू शकत नाही. मग तुम्ही सत्तेत बसले कश्याला?” ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यसरकार टीका केली.

विविध स्तरावर सरकारला अपयश आलेले असून सरकारविरोधी बोलणा-यांचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असे प्रतिपादन रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केले.खरं तर एक वर्षापूर्वी ज्या निवडणूका झाल्या त्यात जनमताचा कौल हा आमच्या बाजुने होता, भाजपा शिवसेना युती होती.युतीला कौल देत भाजपाला 1कोटी 42 लाख मत पडलेत, एनसीपीला 92 लाख, शिवसेनेला 94 लाख, कॉग्रेसला 82 लाख मत पडलेत. हि त्यावेळची मताची आकडेवारी होती असं दानवे म्हणाले.

खुर्चीसाठी हे तिघे एकत्र आले आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून या सरकारवर जनता नाराज आहे आणि हि नाराजी जनता आत्ता होऊ घातलेल्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनूकांमध्ये दाखवुन देईल. सर्व ठिकाणचे भाजपाचे उमेदवार विजयी होतील याची मला खात्री आहेअसं दानवे म्हणाले.

दानवे म्हणाले, आपण बघत असाल या राज्यामध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यात हे अपयशी ठरले कोविड च्या काळात क्वारंटाईन झालेल्या महिलावर देखिल अत्याचार झालेत. यासह अनेक घटनांमध्ये अनेक महिला तसेच मुलींना जीव गमवावा लागला असे म्हणत सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!