Share

‘योगीजी, या निरागस चिमुकलीच्या किंकाळ्या तुम्हाला झोप कशी येऊ देतात?’

Published On: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (UP) कानपूर देहात येथे पोलीस एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीच्या कडेवर एक चिमुकली असताना पोलीस त्याला काठ्यांनी मारहाण करत आहेत. ही घटना अकबरपूर येथील जिल्हा रुग्णलयासमोरील आहे. यावर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीनिवास बी.व्ही. (Shrinivas BV) यांनी ट्विट करत केंद्र सरकार व उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यावर निशाना साधला आहे.

श्रीनिवास बी व्ही ट्विटमध्ये म्हणतात, ‘योगी जी, इस मासूम की चीखें आपको सोने कैसे दे रही है?’

मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक वी के मिश्रा याला निलंबित करण्यात आले आहे. सदरील पोलीस निरीक्षकाने मारहाण करताना त्या चिमुकल्या मुलीलाही हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडीओमध्ये पीडित व्यक्ती मुलीला लागेल मारु नका, अशी विनंती त्या पोलीस निरक्षकास करताना दिसत आहे. आंदोलनकर्ते रुग्णालयातील ओपीडीला बंद करण्याचा प्रयत्न करत होते. असा दावा आता पोलिसांनी केला आहे.

गुरुवारी संसदेमध्ये केद्र सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीचा दाखला देत उत्तर प्रदेशात या वर्षी सर्वाधिक मानवाधिकार उल्लंघनाची प्रकरणं दाखल असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून उत्तर प्रदेश पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं असून समाजातील सर्वच स्तरातून उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. या कृत्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!