Share

‘मनसे म्हणजे गळकं घर’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक नेते महाराष्ट्राचा दौरा देखील करत आहेत. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सुद्धा राज्याचा दौरा करणार आहेत. येत्या १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबाद येथे येणार असून मारठवड्याचा दौरा करणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मनसे (MNS) पक्षाला गळती लागल्याचे दिसत आहे.

गुरुवारी औरंगाबाद येथे मनसेच्या अनेक नेत्यांनी व पदाधिकऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या पुढाकारातून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. औरंगाबादमध्ये आता मनसेचा फारसा प्रभाव राहिला नसल्याचे चित्र यातून दिसत आहे. मनसेचा प्रभाव पुन्हा एकदा वाढवा यासाठीच राज ठाकरे औरंगाबाद दौरा करणार आहेत, मात्र दौऱ्यापूर्वीच अनेक नेत्यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेचा हात धरला आहे.

शिवसेना (Shivsena) पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळेस पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनसेवर टीका केली आहे. मनसे गळकं घर असल्याने मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. इथे प्रवेश मिळतो, पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही. शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे, अशा शब्दात सुभाष देसाई यांनी मनसेवर टीका केली आहे. सुभाष देसाई यांच्या सुरात सूर मिसळत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेवर टीका केली. मनसे नवीन घर आहे, म्हणून आम्ही त्यात प्रवेश केला होता. पण तिथे थंडीत कुडकुडण्याशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही, त्यामुळे आम्ही जुन्या घरात परत आलो, असे पदाधिकारी म्हणाले. एकंदरीतच आता निवडणुकीच्या तोंडावर मनसे समोर मोठे आव्हान असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!