उत्तर प्रदेश : उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील १ लाख २३ हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच अंगणवाडी केंद्राला इन्फॅटोमीटर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पोषण अभियान के अंतर्गत आंगनबाड़ी कार्यकर्त्रियों को तकनीक से जोड़ने व उनकी कार्य सुविधा हेतु 1.23 लाख स्मार्टफोन तथा बच्चों के स्वास्थ्य परीक्षण हेतु 1.87 लाख इन्फैंटोमीटर का वितरण… https://t.co/GLKKGIImY1
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 28, 2021
निवडणुकांपूर्वी सरकारने लोकांना अशा वस्तू वाटून मत मिळवण्याचा हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वी २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्याची घोषणाही केली होती. आजही समाजवादी नेते त्यांच्या सरकारच्या या निर्णयाचा उल्लेख करतांना दिसत असतात.
दरम्यान, यूपीमध्ये १.८९ लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यात सुमारे ४ लाख सक्रिय कर्मचारी आहेत. अशा स्थितीत अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळणे खूप सोयीचे होईल. या योजनेमुळे महिला आणि बाल योजनांशी संबंधित डेटा सरकारपर्यंत पोहोचत राहील आणि महिला आणि मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील, असा विश्वास योगी सरकारने दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपी करण्यासाठी अजितदादांच्याअध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन
- बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकीसह अतिवृष्टीग्रस्त भागात राणाजगजितसिंह यांचा पायी दौरा
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील


