मुंबई : भारतीय तपास यंत्रणांनी १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार असलेला दहशतवादी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातीत ताब्यात घेतले आहे. लवकरच त्याला देशात आणण्यात येणार आहे. मुंबईत १२ ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये २५७ नागरिकांचा बळी गेला होता. याशिवाय ७१३ जण जखमी झाले होते. यावर भाजप नेते आ. अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘भारतीय तपास यंत्रणांनी १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आणि प्रमुख दहशतवादी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातीत ताब्यात घेतले आहे. आंतर राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारने प्रस्थापित केलेल्या कूटनितीचे हे अभूतपूर्व यश आहे. यह मोदी सरकार है… कोई नहीं बचेगा।’ असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
भारतीय तपास यंत्रणांनी १९९३च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आणि प्रमुख दहशतवादी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातीत ताब्यात घेतले आहे.
आंतर राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारने प्रस्थापित केलेल्या कूटनितीचे हे अभूतपूर्व यश आहे.
यह मोदी सरकार है… कोई नहीं बचेगा। pic.twitter.com/9n84dPCmYN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 5, 2022
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकरने पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र आणि बॉम्बच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने मुंबईतील स्फोटांमध्ये वापरलेले ‘आरडीक्स’ पेरण्याचे काम केले होते. मुंबई बॉम्बस्फोटाची योजना दुबईतील दाऊद इब्राहिमच्या घरी रचल्याचेही तपासात उघड झाले होते. गेली २९ वर्षे अबू बकर भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा देऊन संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तानात राहात असल्याचेही समोर आले होते. बकरला २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, त्याने सादर केलेल्या दस्तावेजांमुळे संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱ्यांनी मुक्तता केली होती.
महत्वाच्या बातम्या

