मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही का?

मुंबई: गेल्या दोन वर्षापासून राज्यात शिवजयंती साजरी झाली नाही. त्यामुळे शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. शिवजयंती आली की सरकारचे नवे नियम जारी होतात. राजकीय सभांना मुभा आणि  शिवजयंती म्हटल की सरकारला नको वाटते. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती (Shivjayanti २०२२) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांना परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातच राजकीय नेत्यांच्या भरसभा, पत्रकार परिषद होत आहेत. यामध्ये हजारोंची गर्दी जमत असताना शिवउत्सवात संख्येवर मर्यादा का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी दोन-दोन शिवजयंती साजरी न करता एकच शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली होती. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही का? असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांशी होऊच शकत नाही, त्यामुळे महाराजांची जयंती पंचांगातील तिथीनुसार म्हणजेच दरवर्षी फाल्गुन कृष्ण तृतीयेलाच साजरी होईल असा आदेश खुद्द शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. त्यामुळे शिवसैनिक दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करू लागले. कालांतराने दोन- दोन शिवजयंतीचा वाद चिघळला, मात्र बाळासाहेबांनी माघार घेतली नाही. मात्र आता शिवसेनेच्या आमदारांनीच ‘एक राजा एक जयंती’ याला समर्थन केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांना तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही काय? असा सवाल आता निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या: