Share

कंगना रनौतचे जबरी फॅन आहेत योगी आदित्यनाथ! म्हणाले, “तिचा चित्रपट तर…”

Published On: 

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा चर्चेत आली असून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP Chief Minister Yogi Adityanath ) यांना कंगनाचे चित्रपट पाहायचे आहे असे म्हटले आहे.

दरम्यान कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या (Instagram account) स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ बोलतात की, जगातली सगळ्यात मोठी फिल्मसिटी असेल आणि सगळ्यात चांगली असेल. त्यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देत योगी आदित्यनाथ बोलताता “मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार!” यामुळे कंगनाचे जबरी फॅन असल्याची चर्चा रंगत आहे. हा व्हिडीओ आधी कंगनाच्या एका फॅनक्लबने शेअर केला होता. त्यानंतर कंगनाने त्याला स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “महाराज जी” असं म्हणतं कंगनाने हात जोडण्याची इमोटीकॉन वापरले आहे. कंगनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच कंगना बऱ्याचदा बीजेपी च्या समर्थनात ट्विट करत असून तिचे वक्तव्य व्हायरल ही होतात. अलिकडेच स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टिका झाली. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटा व्यतिरिक्त कंगनाचा ‘तेजस’ आणि ‘धाकड’ (Tejas’ and ‘Dhakad’) चित्रपटात झळणार असल्याने तिच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!