बीड : मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी संभाजीराजे शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते.
या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही?’ त्यावर संभाजीराजे म्हणाले, ‘प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा’.
त्यामुळे संभाजीराजे यांच्या मनात नेमकं काय चाललं यावर चर्चा होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी संभाजीराजेंच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री मुंडे यांनी परळीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये’, असे मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रयत्न सोडून दे आता तुझी इमेज सुधारणार नाही’ ; सुशांतच्या चाहत्यांकडून रिया पुन्हा ट्रोल
- श्रीलंकेत असलेल्या टीम इंडियाचा सराचा व्हिडिओ व्हायरल ; प्रशिक्षकाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- ‘तो युवा खेळाडुमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो’ इरफानने केले द्रविडचे कौतुक
- स्मृती मंधानाचा अफलातून कॅच ; व्हिडिओ होतोय व्हायरल
- श्रीलंका दौरा हा द्रविड आणि बीसीसीआयसाठी सारखाच महत्वाचा- लक्ष्मण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

