पुणे : “राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांची सभा वेल प्लॅनड असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या. राज यांनी भगवा झेंडा केला आनंद आहे. त्यांना भगवा हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे याचं नाव सुचवलं होत. पण परत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला,” असेही रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
“सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे. मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही. पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये. आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा. समाज अल्पसंख्याक आहे धमकीची भाषा कोणी करू नये,” असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
३ मे ला जर कोणी मशीदवरील भोंगे काढायला कोणी आले तर माझे कार्यकर्ते त्याच संरक्षण करणार आहेत.आम्ही ही दादागिरी करू शकतो ,आम्हाला दादागिरी येते. पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेच आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. अजान थोड्या वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची. मराठा समाज आरक्षण, भूमिहिंनाना जमीन मिळावी या आणि अशा अनेक मागणीसाठी येत्या १० मे ला राज्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन व रास्ता रोको करण्यात येणार आहे. महापालिका जिल्हा परिषद निवडणुका भाजप सोबत लढणार तर जिकडे युती होणार नाही तिकडे स्वबळावर लढणार आहे. मुबंई पुण्यात युती होणार, मुबंई मधील सत्ता उलथवून टाकण्याच प्लॅनिंग आमचं आहे. यावेळी जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. मुबंई मध्ये भाजपचा महापौर झाला तर आम्हाला उपमहापौर पद मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे रामदास आठवले यांनी म्हंटले
शरद पवार यांच्यामुळे जातीवाद वाढला नाही अस माझं मत आहे पण त्याच्या काही लोकांमुळे जातीवाद वाढला आहे. अमोल मिटकरी सारखे लोक आहेत जे समाजात तेढ निर्माण करतात, त्यांचा निषेध व्यक्त करतो. पवार जातीवादी नाहीत, असे रामदास आठवले यांनी म्हंटले.
महत्वाच्या बातम्या :


