कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं स्वप्न उधळून लावल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला एका मागोमाग एक धक्के देत आहेत. काल थेट भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांना तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर त्यांनी आणलं आहे. मुकुल रॉय कोलकात्यात TMC च्या कार्यालयात पोहोचल्याबरोबरच बातम्यांना उधाण आले होते. मुकुल रॉय आणि त्यांचा शुभ्रांशु रॉय दोघांनीही TMC मध्ये प्रवेश केला आहे. मोदी-शहांचा विश्वासू नेता आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद असलेला नेता मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत.
त्यानंतर २४ तासांच्या आतच मुकुल रॉय यांनी त्यांना केंद्राकडून देण्यात आलेली सुरक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे त्यांना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारनं त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या पोलिसांची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासूनच मुकुल रॉय यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील कांचरापारा येथील निवासस्थानी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
राज्य सचिवालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकुल रॉय यांना राज्य सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. परंतु अधिकृतरित्या या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मुकुल रॉय यांना व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानंतर बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती.
दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर ममतांनी भाजपला दिलेला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- नया है वह : भाजपने नव्हे तर चक्क राष्ट्रवादीने उडवली पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याची खिल्ली
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड


