Share

कसोटीचे महाभारत! सहाव्या सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित

Published On: 

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा सहावा सामना बांग्लादेशविरुद्ध 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान इंदोर येथे झाला होता.

नाणेफेक जिंकत बांग्लादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजासमोर बांग्लादेशच्या खेळाडुंचा निभाव लागला नाही आणि संपुर्ण संघ 150 धावावर माघारी तंबुत परतला. बांग्लादेशकडु मुशफिकुर रहिमने सर्वाधिक 43 धावांची खेळी साकारली. तर भारताकडुन या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. बांग्लादेशच्या 150 धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या डावात 6 गडी गमावत 493 धावांवर डाव घोषीत केला. भारताकडुन सलामीवीर मंयक अग्रवालने सर्वाधिक 243 धावांची द्विशतकी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त उपकर्णधार अंजिक्य रहाणे(86), चेतेश्वर पुजारा(54) आणि रविंद्र जडेजा (60) यांनी अर्धशतकी खेळी साकारली. पहिल्या डावात भारतीय संघाने 343 धावांची आघाडी घेतली.

बांग्लादेशच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजानी पुन्हा वर्चस्व गाजवले. दुसऱ्या डावात बांग्लादेशचा अर्धा संघ 72 धावांवर तंबुत माघारी परतला होता. मात्र मधल्या फळीतील फलंदाजानी झुंज दिल्याने 200 धावांचा टप्पा ओलांडला. मात्र 213 धावांवर संपुर्ण संघ बाद झाला आणि भारताने हा सामना एक डाव आणि 130 धावांनी जिकंला. बांग्लादेशकडुन या डावात मुशफिकुर रहिमने सर्वाधिक 64 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तर भारताकडुन मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

पहिल्या डावातील द्विशतकासाठी मंयक अग्रवालला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या सामन्यात मंयक अग्रवालने कमी कसोटी सामन्यात 2 द्विशतक झळकावण्याच्या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले. तर आर अश्विनने मायदेशात 250 बळी पुर्ण केले. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यातील 20 पैकी 15 गडी हे वेगवान गोलंदाजानी बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!