Share

नया है वह : भाजपने नव्हे तर चक्क राष्ट्रवादीने उडवली पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याची खिल्ली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. शरद पवार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार चालवताना होणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मोदी-ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचं नातं संपलं नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

हे सर्व सुरु असताना  शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर  दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे  छातीठोकपणे सांगत आहेत. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे.

पटोले यांच्या   स्वबळाच्या नाऱ्याची भाजपकडून नेहमीच खिल्ली उडवली जाते मात्र आता पटोले यांच्या या दाव्याची चक्क राष्ट्रवादीचे नेते देखील खिल्ली उडवू लागले आहेत. राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक ट्वीट करून पटोले यांची चांगलीच टर उडवली आहे.

चव्हाण यांनी एक विनोद ट्वीट केला असून यामाध्यमातून त्यांनी पटोले यांची खिल्ली उडवली. पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर इतर काँगेस नेते (खाजगीत) नया है वह असे म्हणतात असे सांगणारा एक विनोद पोस्ट केला आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची जर सहकारी पक्ष अशा पद्धतीने जाहीररीत्या खिल्ली यातच सर्वकाही आलं. याशिवाय कॉंग्रेसला त्यांचे सहकारी पक्ष किती गांभीर्याने घेतात हे देखील यावरून दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!