मुंबई : फ्रेंच ओपन स्पर्धेत शुक्रवारी पार पडलेल्या पुरुष एकेरी उपांत्य फेरीच्या सामन्यात सार्बियाचा खेळाडु नोवाक जोकोविचने स्पेनचा राफेल नदालचा पराभव केला आहे. या पराभवासह जोकोविचने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. राफेल नदालला फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभव करणारा जोकोविच पहिलाच खेळाडु ठरला आहे.
राफेल नदाल आणि जोकोविच याच्यांतील उपांत्य फेरीचा सामना 4 तास 22 मिनिटे चालला. या सामन्यात जोकोविचने नदालचा 3-6, 6-3, 7-6 आणि 6-2 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह जोकोविचने सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनची दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. गतवर्षीच्या अंतिम फेरीत जोकोविचला राफेल नदालने पराभुत करत जेतेपदावर नाव कोरले होते. आजच्या सामन्यात नादेलला पराभुत करत जोकोविचने गतवर्षीचा बदला घेतला आहे.
9️⃣3️⃣ minute set ????#RolandGarros pic.twitter.com/ltafs4vNHx
— Roland-Garros (@rolandgarros) June 11, 2021
राफेल नदालचा या स्पर्धेतील हा केवळ तिसरा पराभव आहे. नदालने या स्पर्धेत 108 सामने खेळले आहेत. त्यापैकी 105 सामन्यात विजय मिळवला आहे. ‘पॅरिसमध्ये खेळलेल्या सामन्यापैकी हा सामना अतंत्य अविस्मरणीय होता’ अशी प्रतिक्रिया जोकोविचने या विजयानंतर दिली. या स्पर्धेचा अंतिम सामना हा रविवारी 13 जुन रोजी होणार आहे. या सामन्यात जोकोविचला ग्रीसचा खेळाडू स्टिफानोस त्सिस्तिपासचे आव्हान असणार आहे. स्टिफानोसने प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्याने उपांत्य फेरीत जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत केले होते.
महत्वाच्या बातम्या
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- नव्या इंनिगंसाठी ‘राणादा’ सज्ज; न्यु लुक्सची सर्वत्र चर्चा
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- गायिका सावनीने बेबी शॉवरचे फोटो केले सोशल मीडियावर शेअर


