🕒 1 min read
मुंबई : 2007 टी -20 विश्वचषकात माजी अष्टपैलू युवराज सिंगने 6 चेंडूत 6 षटकारासह इतिहासात नोंद केली आहे. युवराजने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात ही कामगिरी केली. युवराज षटकारांचा पाऊस पाडत असताना महेंद्रसिंग धोनी दुसर्या बाजूला उभा होता. युवराजच्या या कृत्यावर धोनीची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा युवराज सिंगने स्वतः केला आहे.
युवराजने दोन वर्षांच्या सेवानिवृत्तीनंतर पॉडकास्टमध्ये (गौरव कपूरसोबत 22 यार्न) हे उघड केले आहे. तो म्हणाला, ‘माझ्यामते धोनी खूप आनंदी होता. जर तुम्ही कर्णधार असाल आणि एखादा खेळाडू सलग षटकार मारत असेल तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल की स्कोअरबोर्ड पुढे जात आहे. आम्हाला तो सामना जिंकण्याची गरज होती.
टी -20 विश्वचषकातील 21 व्या सामन्यात भारताच्या डावाचा 18 वा षटक चालू होता, अँड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता. त्यावेळी यवराज आणि फ्लिंटॉफनमध्ये वाद झाला होता. तो युवराजला काहीतरी बोलला होता, त्याचाच फटका ब्रॉडला सहन करावा लागला.
19 व्या षटकात युवराजने ब्रॉडच्या सर्व चेंडू सीमा हद्दीत पार केले. युवराजने अवघ्या 12 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपात अद्याप विक्रम आहे. युवीने एकूण 16 चेंडूत 58 धावा केल्या त्या दरम्यान त्याने 7 षटकार आणि 3 चौकार लगावले.
गौरव कपूर सोबतच्या 22 यार्नमध्ये युवराज फ्लिंटॉफशी झालेल्या वादावरुन म्हणाला, ‘मला आठवते की फ्लिंटॉफला मी दोन चौकार मारले होते आणि साहजिकच त्याला ते आवडले नसते. फ्लिंटॉफ मला म्हणाला, ‘तुझा मान पिरगळेल.’ युवराजने सांगितले की हा लढा खूप गंभीर होता. मला वाटले की मी प्रत्येक बॉलला षटकारापर्यंत पोहोचायला हवे.
युवराज सिंगने 40 कसोटी सामने, 304 वनडे आणि 58 टी -20 सामने खेळले. युवराजने कसोटी सामन्यात तीन शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1900 धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यात त्याने 14 शतके आणि 52 अर्धशतकांच्या मदतीने 8701 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने केले चॉकलेटचे वाटप!
- ‘एकदा या स्मार्ट शहराची यातना बघा ओ’, औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या पोस्टवर नागरिकांच्या भन्नाट प्रतिक्रिया!
- ‘प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय’, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल
- ‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही’
- येणाऱ्या काळात खाम नदीकाठ पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल- पालकमंत्री देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
