🕒 1 min read
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्यान नवनवे आरोप केले जात असताना समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यावर प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले जात आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर आर्थिक व्यवहारांचे आरोप केले आहेत.
समीर वानखेडे यांच्या बहिणीवर देखील नवाब मलिकांनी आरोप केले होते. पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्या व्हॉट्सअप चॅटचे काही फोटो दाखवले. जास्मिन वानखेडे या सुरुवातीपासून बोलत होत्या की, त्या आपल्या भावाच्या कामात दखल देत नाहीत. पण या चॅटद्वारे असे दिसते की, ड्रग्ज प्रकरणात अडकलेला एक व्यक्ती जास्मिन वानखेडे यांना व्हॉट्सअपवर त्यांचा पत्ता आणि विझिटींग कार्ड मागत आहे. यावरुनच वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी आणि त्यांची बहिण लेडी डॉन वसुलीमध्ये सामील असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
त्यावर वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सलमान नावाच्या एका ड्रग्ज पेडलरनं माझ्या बहिणीची भेट घेतली होती. पण ती एनडीपीएसच्या केसेस हाताळत नसल्यामुळं तिने त्याला परत पाठवले. त्यानंतर सलमानने आम्हाला एक मध्यस्थीकरवी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला नंतर अटक झाली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याचं व्हॉट्सअॅप चॅट करुन चुकीचे आरोप केले जात आहेत,’ असे वानखेडेंनी स्पष्ट केले.
A peddler, Salman had approached my sister but she doesn't take NDPS cases so she sent him back. Salman had tried to trap us via a middleman. He was arrested &he's in jail. False allegations being levelled by sharing his WhatsApp chat: Sameer Wankhede on Nawab Malik's allegations pic.twitter.com/PKVhP2BQ6M
— ANI (@ANI) November 2, 2021
‘ज्यानं आम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्या मध्यस्थानं मुंबई पोलिसांत यावर्षी एक खोटी तक्रार दाखल केली होती. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर सलमानसारख्या पेडलर्सचा वापर करुन माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा देखील प्रयत्न झाला. असे प्रयत्न अजूनही होत आहेत. या सगळ्यामागे ड्रग्ज माफिया आहेत,’ असा आरोप समीर वानखेडेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

