🕒 1 min read
नवी दिल्ली : हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले होते. त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये रविवारी गो महासंमेलनाला संबोधित करताना रामदेव बाबा यांनी हे विधान केले की, “गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे असे म्हंटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी देखील केली आहे.
रामदेव बाबा म्हणाले की, “या जगासाठी सर्वात मोठा धोका हा जातीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद, राजकीय दहशतवाद आणि मेडिकल दहशतवादापासून आहे. मेडिकलवाल्यांबाबत मधे मी बोललेलो तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. राजकीय दहशतवाद सर्वात वर आहे, जातीय दुसऱ्या क्रमांकावर. सर्व धर्म नाहीतर सर्व पंथ असे नाव असायला हवे. पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म, वाऱ्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानव जातीचा धर्म एकच असणार” असं काही दिवसांपूर्वी योगगुरु आणि हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा यांना म्हटलं होतं. तसेच पतंजलीने गायींसाठी गोरक्षण मोहीम सुरू केली आहे.
पुढे ते म्हणाले, “आम्ही सर्वांना हिंदू बनवू, मुस्लिम बनवू, इसाई बनवू यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस बनवू असे म्हटले पाहिजे. सर्व जगातील धर्माचार्य एकाच स्वरात म्हणाले की, आम्ही सारे एक आहोत तर किती चांगले होईल. कोणीतरी येतो, म्हणतो ब्राम्हण महान, ओबीसी महान, क्षत्रिय महान, शूद्र महान, हे काय आहे. आपण सारे एक आहोत. आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे. काही लोक संन्यासी होतात, लाडू खाऊन आपल्याला लोकांनी संन्यासी म्हणावे, अशी या लोकांची अपेक्षा असते. आपण एकाच देवाची मुले आहोत. एकाच धरतीवर राहतो असे सर्वांनी म्हणायला हवे”, असंही रामदेव बाबा म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..
- संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या- एच. के. पाटील
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
- ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत हरिकाची पोगोनिनाविरुद्ध आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
