Share

भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढती महागाई आणि इंधन दरवाढीवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी आर्यन खानला जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खानला आत ठेवले होते असे त्या म्हणाल्या. तसेच गॅस दरवाढीमुळे मी दिवाळीमध्ये भाऊबीज म्हणून अजित पवार यांच्यासह इतर भावांकडे गॅस सिलेंडर मागणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या,’सिलेंडरचा भाव वाढला आहे. मी अजित पवारांना या दिवाळीत सांगणार आहे. आम्ही आठ बहिणींनी ठरवले आहे की आमच्या सहा भावांनी पुढच्या सहा महिन्यांसाठी आम्हाला प्रत्येकाने फक्त एक एक सिलेंडर द्यायचा. भाऊबीज पाहिजे का सिलेंडर पाहिजे मला सांगा.’

दरम्यान, यावेळी दिवाळीच्या काही आठवणी सांगत त्या म्हणाल्या की,’आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकत्र बसून आम्ही फराळ करतो. प्रत्येकाला वेगवेगळे काम असते. करंजी बनवताना सर्वांकडे एक एक काम असते. यावेळी तिथे घरातील पुरुषांना प्रवेश नसतो. कारण फराळाच्या मध्ये अडथळा आणला की फराळ फसतो. या विभागामध्ये सर्वात कमी टॅलेन्टेड मी आहे. त्यामुळे थंड झालेली करंजी मोठ्या डब्यामध्ये ठेवण्याचे काम माझे असते. दिवाळी आणि दसऱ्यामध्ये जेवढा सिलेंडर आपल्याला लागतो तेवढा कधी लागत नाही. अशा काळात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव वाढला आहे. सरकारला आर्यनला खानला आत ठेवून आणखी भाववाढ करायची होती काय असे मला वाटत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!