🕒 1 min read
मुंबई: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. काल मी जयदीप राणासंदर्भातील काही माहिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जयदीप राणा एका गाण्याचा फायनान्स हेड होता. कालपासून मी कुणाच्या बायकोला टार्गेट करत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, गेल्या 26 दिवसात मी कुणाची आई, बहीण आणि पत्नीचा उल्लेख केला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात, दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन. तुम्हाला इतका वेळ वाट पाहण्याची गरज नाही. मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्याची हिंमत अद्याप कोणीही केली नाही, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी प्रश्न विचारत आहे. दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? किरीट सोमय्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई-बहिणीविषयी बोलतात. किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या पत्नीविषयी बोलले. एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात जावं लागलं. किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी विषयी बोलतात. भाजपनं राजकारणाचा स्तर खालवला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही, त्यामुळे त्यांनी माझी त्वरित माफी मागावी, असं आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही वकील आहात, तुमच्याकडं सनद आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत सहा महिन्यात चार्जशीट फाईल करायची असते. केस कमजोर करण्यासाठी आरोप प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय, मात्र चार्जशीट झाल्यानं केस कमजोर होण्याचा प्रश्न नाही. देवेंद्र फडणवीस माफी मागणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..
- संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या- एच. के. पाटील
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
- ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत हरिकाची पोगोनिनाविरुद्ध आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
