Share

दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. काल मी जयदीप राणासंदर्भातील काही माहिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जयदीप राणा एका गाण्याचा फायनान्स हेड होता. कालपासून मी कुणाच्या बायकोला टार्गेट करत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, गेल्या 26 दिवसात मी कुणाची आई, बहीण आणि पत्नीचा उल्लेख केला नाही. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी प्रश्न विचारत आहे. दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? किरीट सोमय्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई-बहिणीविषयी बोलले. संजय राऊत यांच्या पत्नीविषयी बोलले. एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात जावं लागलं. किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी विषयी बोलतात. मग दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? असा सवाल करत भाजपनं राजकारणाचा स्तर खालवला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस समीर वानखेडे तुमचा निकटवर्तीय आहे. त्याच्याकडून पंचनामा मागवा. माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं नाही. मी तो पंचनामा दाखवणार आहे. 14 जानेवारीला नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!