Share

Boman Irani : “येरे येरे पावसा…” मुंबईचा पाऊस पाहून बोमन इराणींनी गायली मराठी कविता, पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयामुळे लोकांचे मनोरंजन केले आहे. त्यातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी. सध्या बोमन इराणी त्यांच्या एका व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. बोमन इराणी यांनी देखील पावसाचा आनंद घेतला आहे. त्याचाच एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बोमन इराणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. बोमन इराणी यांनी मुंबईतील पावसाची मज्जा घेतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘हा पाऊस पाहून मला माझं लहानपण आठवलं. आम्ही लहानपणी असेच शाळेत जायचो. हा माझा घरचा परिसर आहे, जिथे आता सध्या पाणी साचलं आहे.’ असं म्हणत बोमन इराणी यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवला आहे.

https://www.instagram.com/p/Cfb6ekDIiky/

व्हिडिओमध्ये बोमन इराणी मराठीमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!