Share

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाने आठवड्याभरात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Published On: 

मुंबई : ‘जुग जुग जिओ’ (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी हे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. प्रदर्शनानंतर पहिल्या विकेंडला या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण सोमवारपासून या कामाईमध्ये घसरण होऊ लागली आहे. गेल्या सात दिवसात ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाने ५३.६६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या मधील गाणी सुपरहिट ठरली. पंजाबन, दुपट्टा आणि रंगसारी या गाण्यावर इंस्टाग्रामवर रील शेअर केले जाऊ लागले. या वर्षांमध्ये पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. पहिल्या क्रमांकावर ,भूल भुलैया २’ हा चित्रपट आहे तर पाचव्या क्रमांकावर ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट आहे.

दिग्दर्शक राज मेहता यांच्या वैवाहिक जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा एक मनोरंजन चित्रपट आहे. अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली हे देखील आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!