मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार राज्यात कोसळलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आधीच्या सरकारच्या निर्णयांना बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे का? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. कारण नव्याने आलेल्या या सरकारनं कालच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेट्रो कारशेडचा निर्णय बदलला आहे. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात अॅड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह बाकी निर्णय घेतले जाणार आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तेवढ्यातच शरद पवार यांना अजून एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समोर येत आहे. त्याबरोबरच राज्यातील मल्लांकडूनही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. १५ वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

