Share

Kubra Sait : “वन नाइट स्टँड, प्रेग्नंसी आणि गर्भपात”, याबाबत कुब्रा सैतने केला धक्कादायक खुलासा

Published On: 

मुंबई : ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधील बोल्ड व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैत तिच्या खऱ्या आयुष्यात कमी बोल्ड नाही. नुकतेच तिचे ‘ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर’ हे पुस्तक लॉन्च झाले आहे. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने तिच्यासोबत झालेल्या शारीरिक शोषणपासून ते बॉडी शेमिंगपर्यंत सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिने नको असलेल्या प्रेग्नन्सीबाबतही खुलासा केला आहे.

कुब्रा सैतने पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की २०१३ मध्ये वन नाईट स्टँडनंतर ती गर्भवती झाली होती, त्यानंतर तिला गर्भपात करावा लागला होता. त्यावेळी कुब्राचे वय 30 वर्षे होते. अभिनेत्रीने खुलासा केला की, ती त्या वेळी अंदमानच्या सहलीवर होती, त्या ठिकाणी ड्रिंक केल्यानंतर आपल्या एका मित्रासोबत ती इंटिमेट झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.

https://www.instagram.com/p/CfUHNdDDwmh/

आपल्या आयुष्यातील या घटनेबद्दल बोलताना एका मुलाखतीत कुब्रा म्हणाली, “मला वाटते की मी त्यावेळी यासाठी तयार नव्हते. आजही मी आई होण्यासाठी तयार नाहीये. वयाच्या २३ व्या वर्षी लग्न आणि मग ३० व्या वर्षी आई होणं हे माझ्याकडून होणार नाही. मला माहित आहे की मी तयार नाही आणि मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबद्दल मला पच्छाताप होत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!