🕒 1 min read
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. आता काहीअंशी जनजीवन सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान,कर्नाटकमध्ये इयत्ता 10वी आणि 12वी चे वर्ग आणि इयत्ता 6वी आणि 9वी चा विद्यागम उपक्रम, येत्या 1 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड19साठीच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे वर्ग सुरू केले जातील.
दरम्यान,तिकडे बिहार राज्यातील इयत्ता 9 वी च्या पुढील वर्गांच्या शाळा आणि कोचिंग क्लास 4जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समूहाने कोविड सुरक्षेचे सर्व खबरदारीचे उपाय पाळत वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सर्व काही यथास्थित झाल्यास आगामी काळात टप्प्या टप्प्याने खालच्या इयत्तांचे वर्गही सुरु करण्यात येतील.
याशिवाय मध्यप्रदेशात देखील नुकत्याच ३ दिवसांपासून इयत्ता 9 वी ते 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी शाळा सुरु झाल्या आहेत.नियमावलीनुसार या व्यतिरिक्त अन्य निर्णय घेण्यासाठी आज पालक शिक्षक बैठक घेण्याचे आदेशही मध्यप्रदेशच्या सार्वजनिक शिक्षण आयुक्त जयश्री कियावत यांनी दिले आहेत .
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- … म्हणून भाई जगताप यांची निवड कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- इस्रायलमध्येही करोना लसीकरणाला सुरुवात; पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
