Share

इस्रायलमध्येही करोना लसीकरणाला सुरुवात; पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली लस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. कोरोनावरील लसीवर देखील मोठ्याप्रमाणावर संशोधन सुरु आहे. दरम्यान आता काही देश उपलब्ध असलेल्या लसीचे लसीकरण देशांतर्गत सुरु करत आहेत.

आधी ब्रिटन आणि इतर काही देशांनी कोरोनावरील लसीला नागरिकांना द्यायला सुरुवात केली असताना लसीकरण सुरु करणाऱ्या देशांच्या यादीत इस्रायल या देशाचे नाव देखील जोडले गेले आहे.

इस्रायलमध्येही करोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी करोना लस घेतली. नेतन्याहू ही करोना लस घेणारे इस्रायलमधील पहिले व्यक्ती आहेत. लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. याआधी अमेरिका, रशिया, ब्रिटनमध्ये करोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

लसीकरण केल्यानंतर नेत्यानाहू यांनी हा सर्वात आनंदी क्षण असल्याचे म्हटले. तसेच, लवकरच इस्रायलमध्ये सर्वकाही पूर्वीप्रमाणे सुरू होईल, असे आश्वासनही नागरिकांना दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!